सातबारा उतारा म्हणजे नेमके काय असते? | ७/१२ चा उतारा म्हणजे काय? | 7/12 Information in Marathi

सातबारा उतारा म्हणजे नेमके काय असते? | 7/12 Information in Marathi

WhatsApp Group Join Now

Table of Contents

सातबारा म्हणजे जमिनीची कुंडली असते | 7/12 चा उतारा म्हणजे काय?

मित्रांनो, सातबारा उतारा म्हणजे आपल्या जमिनीचे एक प्रकारचे दर्पण म्हणजेच आरसा असतो. कारण ह्यात आपल्याला प्रत्यक्ष जमिन असलेल्या जागेवर जाण्याची अजिबात गरज पडत नसते नुसता सातबारा पाहुन आपल्याला त्या जागेच्या जमिनीचा सर्व लेखाजोखा हा कळत असतो. ती जमिन कोणाची आहे? कोणाच्या नावावर आहे? इत्यादी.

अणि जमीन अणि महसुलाची माहीती जाणुन घेण्यासाठी आपल्याला सातबारा म्हणजे काय आहे? तो कसा आँनलाईन कसा शोधायचा? तसेच मिळवायचा असतो? सातबारा उतारायाचे महत्व काय असते. हे जाणुन घेणे फार गरजेचे आहे म्हणुन हा आजचा लेख आपण सातबारा ह्या विषयावर घेतला आहे.

म्हणजेच हा उतारा वाचुन आपण प्रत्यक्ष त्या जमिनीच्या ठिकाणी न जाऊनही त्या जमिनीचा संपुर्ण अंदाज आपल्याला आपल्या बसल्या जागी कळत असतो. महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र जमीन महसुल कायद्या अंतर्गत शेतजमिनींच्या अधिकाराबाबद विविध प्रकारच्या नोंदी ह्या ठेवल्या जात असतात. यासाठी वेगवेगळया प्रकारची पुस्तके नोंदणीसाठी असतात(register book).

अणि ह्या register मध्ये कुळाचा मालकी हक्क, शेतजमिनीचा हक्क, त्यातल्या पिकांचा हक्क यांचा समावेश केलेला असतो. तसेच यासोबत यात एकवीस वेगवेगळ्या प्रकारचे गावातील नमुने देखील यामध्ये ठेवलेले असतात. यापैकी गावाचा नमुना नंबर सात आणि गावाचा नमुना नंबर बारा मिळुन सातबारा उतारा हा तयार होत असतो. म्हणुन ह्या उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हटले जाते.

सातबारा उतारा काय दर्शविण्याचे काम करत असतो? | 7/12 Information in Marathi

प्रत्येक जमीनधारकाला आपल्या स्वताकडे असलेली जमीन किती आहे व कोणती आहे? हे सातबारा उताऱ्यावरून कळत असते. यात ‘गावाचा नमुना सात’ हे अधिकाराचे पत्रक असते व ‘गाव नमुना बारा‘ हे पीक पाहणीचे पत्रक असते. जमीन व महसुलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावाच्या तलाठीकडे हे ‘गावाचे नमुने’ उपलब्ध असतात. बालाजी सातबारा उतारा उताऱ्याच्या अगदी वर गाव, तालुका, जिल्हा इत्यादी हे नमुद केलेले असतात. सात बारा हा जमीन मालकी अधिकाराचा प्राथमिक व अंतिमत पुरावा असतो.

यात आपल्याला जमीनीवर कोणाचा मालकी हक्क आहे.हे कळत असते. सात बारा ची नवीन पुस्तके साधारणता ही साधारणत दहा वर्षानी लिहिली जात असतात. अणि सातबारा उतारा पीकाच्या पाहणीची नोंद दर वर्षी केली जात असते.

सातबारा उतारा ऑनलाईन पदधतीने कसा मिळवायचा असतो? | Online 7/12 Utara kasa kadava ?

महाभुलेख महाराष्ट्र भुमि अभिलेख Maharashtra Government व राज्यातील तसेच इतर नागरिकांना त्यांच्या शेती व जमीनशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी अधिकृत website सुरू केली आहे. ज्याचे नाव आहे. महा-भुलेख( महाभु लेख महाराष्ट अभिलेख) ह्या portal through सर्व शेतकरी आणि इतर नागरिक त्यांच्या जमिनीशी संबंधित माहिती पाहु शकत असता.

त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वर visit करायचे किंवा https://bhulekh.mahabhumi.gov.in या लिंकवर click करायचे. अणि सात बारा submit button वर click करायचे,मग वरील presubscribed केलेल्या माहिती नुसार आपला सात बारा हा प्रदर्शित होत असतो.

सात बारा उतारा हा आँनलाईन कसा शोधायचा असतो?

  • महाराष्ट्र राज्य भु-लेख यांची अधिकृत website bhulekh.mahabhumi.gov.in या portal वर जायचे.
  • मग website वरच्या screen वर तुम्हाला अमरावती, पुणे, नाशिक,औरंगाबाद, नागपुर, किंवा कोकण या सहा विभागातील तुमचा एक विभाग निवडायचा असतो.
सातबारा उतारा म्हणजे नेमके काय असते? | 7/12 Information in Marathi
सातबारा उतारा म्हणजे नेमके काय असते? | 7/12 Information in Marathi
  • मग go option वर cllick करायचे.मग आपल्या screen वर एक नवीन webpage येते जिथे तुम्हाला सात बारा (७/१२) किंवा 8 A निवडावे लागते.
  • त्या नंतर तुमचा जिल्हा, तालुका व गाव हे निवडायचे असते.
  • त्यानंतर तुमचा servey no टाकायचा असतो. आणि मग search बटण वर click करायचे असते.
  • नंतर तुमचा mobile no नंबर टाकायचा, नंतर तुम्हाला तेथे एक Captcha दिसतो. तो जसाच्या तसा तेथे fill करायचा असतो, अणि मग ओके बटण वर क्लिक करायचे असते.
  • मग तुम्हाला तुमचा 7/12 उतारा हा screen वर दिसत असतो.

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आँनलाईन सातबारा उतारा कसा शोधायचा हे आज बघितले आहे.

जमिनीचा फेरफार online पदधतीने कसा बघायचा?

  • जमिनीचा फेरफार online पाहण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला google वर bhulekh.mahabhumi.gov.in असे search करायचे असते.
  • त्यानंतर maharashtra सरकारच्या महसुल विभागाची website आपल्यासमोर open होईल. मग या website वर उजवीकडे आपली चावडी नावाचे option आपल्याला दिसेल.
  • मग त्यावर click केल्यावर आपली चावडी (डिजीटल नोटीस बोर्ड )नावाचे एक new page तुमच्यासमोर ओपन होत असते .
  • मग आता पुढे तुमच्या गावातील फेरफार नोंदी कशा जाणुन घ्यायच्या ते सविस्तर बघुयात.
  • या page वर district choose हा पर्याय दिलेला असतो. त्याखालील district ह्या काँलम समोर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा असतो, तालुका या काँलमसमोर तालुका निवडायचा असतो, तर गावाच्या काँलमसमोर गावाचे नाव choose करायचे असते.
  • ही सर्व information fill झाल्यावर आपली चावडी पहा या आँप्शनवर क्लिक करायचे असते. त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही ज्या नावाचे नाव टाकलेले असेल त्या गावातील फेरफाराच्या नोंदी open होतात.

यामध्ये तुम्ही बघु शकतात की फेरफार क्रमांक सुरुवातीला दिलेला असतो. त्यानंतर फेरफाराचा प्रकार म्हणजे शेतजमीनीवर बोजा चढवला किंवा कमी केला आहे का?, किंवा वारसाची नोंद केली आहे का? जमीन खरेदी केली आहे का? याप्रमाणे प्रकार हा नोंदवलेला असतो. त्यापुढे फेरफाराची तारीख, objection नोंदवण्याची शेवटची तारीख आणि ज्या servey किंवा गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा व्यवहार झाला आहे तो servey किंवा group क्रमांक यांची माहिती दिलेली असते.

यानंतर सगळ्यात शेवटी see हा option तिथे दिलेला असतो. आता आपण अलीकडे म्हणजे २४ आँगस्ट २०२० मध्ये नोंदवलेल्या फेरफाराविषयीची माहिती जाणून घेऊयात. या फेरफाराचा नंबर एकतीस सते हत्तर असून फेऱफाराचा प्रकार बोजा असा असतो. एकशे सत्त ऐंशी ह्या गट नंबरशी संबंधित हा फेरफार असतो.

यासमोरील see या option वर click केल्यास तुमच्यासमोर एक new page open होईल. गाव नमुना 9 म्हणजेच फेरफाराची notice असे या पेजचे Title असते. यामध्ये सुरुवातीला तालुक्याचे नाव आणि त्यापुढे गावाचे नाव दिलेले असते.आता ही फेरफार notice तीन column मध्ये विभागलेली आहे.

यातल्या first column मध्ये फेरफाराचा number दिलेला असतो. त्यानंतर second column मध्ये जमीन संपादित केलेल्या अधिकाराचे structure सांगितलेले असते. यामध्ये जमिनीच्या कोणत्या प्रकारच्या व्यवहार झाला तसेच तो कोणाकोणा मध्ये झाला आहे? याविषयीची सविस्तर detail information यात दिलेली असते.

या मध्ये next हा व्यवहार कुणाकुणात झाला याची माहिती दिलेली असते. त्यानंतर third column मध्ये ज्या शेतजमिनीवरील अधिकार edit केले गेले असतात त्या शेतजमिनीचा group number दिलेला असतो. त्यानंतर त्याखाली या फेरफार नोंदीशी related काही objection असल्यास ते स्थानिक तलाठीकडे 15 दिवसांच्या आत inform करायचे neither तुमचे कोणतेही objection नाही,असे गृहित धरले जाते अशी notification ही तिथे दिलेली असते.

सातबारा अर्क का महत्वाचा आहे?

सात बारा अर्क दस्तऐवज प्लॉटच्या कायदेशीर स्थितीचे महत्त्वपूर्ण सुचक असते. याचा उपयोग कोणत्याही विशिष्ट जमिनीच्या वडिलोपार्जित माहितीबद्दल माहिती मिळवण्यासाठी केला जात असतो. मागील वाद,खटले, कोर्टाचे आदेश इत्यादी, जमीनीच्या मालकीवर परिणाम होऊ शकतात किंवा तिचा कायदेशीरपणा या दस्तऐवजाच्या तुकड्यात सापडतो. या व्यतिरिक्त सात बारा एक्सट्रॅक्ट ही भूमीवरील भूतकाळातील सर्व कामांची नोंद आहे.

कागदपत्र तयार करणे महत्वाचे आहे जेणेकरून भूमिकेच्या वास्तविक स्वरूपासह अचुक स्थान स्थापित करण्यासाठी आपल्याला जमीन ओळखणे शक्य होईल. शेतीच्या जमीनीसाठी, अर्क देखील जमीन वर शेवटच्या काळात पिकाची नोंद ठेवते.

एखाद्याच्या नावावर जमीन शीर्षक दस्तऐवज (7/12 अर्क) खूप महत्वाचे आहे आणि ग्रामीण आणि अर्ध-ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मालक ओळखण्यासाठी,शेती आणि बिगर-कृषी कर्ज मंजूर करण्यासाठी वापरले जातात. अशी ही कागदपत्रे आहेत. अणि आता ही (डिजिटल स्वरूपात) ऑनलाईन उपलब्ध आहे, ‘असे महाराष्ट्राचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

Also Read : Gudi Padwa in Marathi | Gudi Padwa 2023: अचूक गुढी पाडवा कधी साजरा होणार ? जाणून घ्या या सणाचे महत्त्व.

मित्रांनो, मला मनापासून आशा आहे की सातबारा उतारा म्हणजे नेमके काय असते? याबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि मला आशा आहे याबद्दल समजले असेल. तर मित्रांनो आजचा आर्टिकल मध्ये येवढेच . जर तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट मध्ये आम्हाला सांगा अम्ही ती माहिती Update करू . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी टेक डायरी ला Visit करा .

1 thought on “सातबारा उतारा म्हणजे नेमके काय असते? | ७/१२ चा उतारा म्हणजे काय? | 7/12 Information in Marathi”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now