औषधी तुळस महत्व | तुळशीचे फायदे आणि माहिती

औषधी तुळस महत्व | तुळशीचे फायदे आणि माहिती

WhatsApp Group Join Now

Table of Contents

नमसकार मिंत्रानो, आज आपण तुळशीबद्दल माहिती घेणार आहेत, तर तुळस ही भारतातील एक अत्यंत पवित्र मानली जाणारी आणि औषधी गुणांनी भरलेली एक बहुपयोगी तसेच बहुगुणकारी औषधी वनस्पती आहे. आज आपल्या भारता मध्ये हिंदु धर्मातील प्रत्येक व्यक्तीच्या घरासमोर आज आपल्याला तुळस ही पाहायला मिळते.

कारण तुळशीला हिंदु धर्मा मध्ये फार मानाचे स्थान आहे अणि ती हिंदु धर्मीयांसाठी फार पुजनीय सुदधा आहे.तसेच हिंदु धर्मात तुळशी वृंदावनाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे तुळस ही भारतीयांच्या मनाशी जुळलेले एक अनमोल रोपटे आहे.

सर्दी खोकला ताप तसेच दात दुखणे श्वासरोध, श्वासात दुर्गंधी येणे, दम लागणे, फुफ्फुसांचे आजार, ह्नदयाचे आजार, हया सर्वांमध्ये तुळशीचाच वापर हा केला जात असतो. तुळशीच ताजे पान खाल्ल्यास सर्दी खोकला हा कायमचा बरा होतो. दातांमध्ये तुळशीचे तेल भरल्याने दातांच्या वेदना ह्या कमी होत असतात. तुळशीचे ताजे पान खाल्ल्यास आपल्या तोंडातील दुर्गंधी कमी होत असते.

तुळशीला औषध देखील म्हटले जाते कारण हिच्यात अ अणि ब जीवनसत्व असते.त्याचबरोबर अणि अशी अनेक पोषक द्रव्ये तुळशीत असतात.तुळशीचे तेल हे एक जैवप्रतिरोधी आणि प्रतिरोधी मानले जात असते त्यामुळे हिचा वापर विविध आजारांवर उपचार करण्यासाठी सुदधा केला जात असतो भारतामध्ये तर तुळशीला एक घरगुती औषधाचे भंडार तसेच कोठार म्हणुन संबोधले जात असते.

आजही हिंदु लोकांचे असे मत आहे की तुळस वृंदावन ही आपल्या घराला सर्व negative thoughts आणि bad thinking तसेच त्याच्या effect पासुन आपल्याला वाचवत असते. तुळशी मध्ये असलेल्या प्रतिजैविक आणि वेदनानाशक गुणांमुळे प्रत्येकाला ती हवीहवीशी वाटत असते. तुळशीच्या पानांचा चहा करुन पिल्याने आपल्याला एकदम ताजेतवाने वाटते. अणि आपल्या शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होत असते व मानसिक दृष्टया ही आपण प्रबळ होत असतो.

तुळस आपल्याला विविध infections होण्यापासुन वाचवण्याचे काम करत असते. तुळशीच्या पानांची दोन तीन थेंब पाण्यात टाकल्यास पाणी निर्जंतुक होत असते. लहान बाळांंच्या शिशुच्या अंघोळीसाठी तुळशीची पान पाण्यात टाकून त्याने त्याला अंघोळ घातल्यास आरोग्यदायी मानले जात असते.

तुळशीची पाने ही सुगंधीत असतात, हिच्या पानांचा सुगंध घेतल्यावर आपल्या श्ववास तंत्रातील जिवाणुंचे संक्रमण हे कमी होत असते. प्रत्येक घरासमोर आज एक तुळस असल्यास त्या घरातील हवा शुध्द राहते. तुळस पानांना खलबत्यात कुटुन त्यांना मधासोबत प्राशन केले तर आपल्या गळयातील कफ दुर होत असतात. भारतात पारंपारीक पध्दतीने विविध जैविक संक्रमणात विविध औषंधांसोबत तुळशीच्या पानांचा वापर केला जात असतो.

तुळस ही आपल्या घरातील जणु एक सभासद असते.म्हणुनच आपण तिचे घरातील मुलामुलींचे जसे आपण लग्न लावुन देत असतो एकदम त्याचप्रमाणे तिचेही लग्न लावुन देत असतो यालाच आपण तुळशीविवाह. तसेच तुळशीचे लग्न असे देखील म्हणतो.

तुळशीची उपयुक्‍तता पाहिल्यावर औषध म्हणुन तुळशीचाच वापर का करतो त्यासाठी तुळशीचीच का निवड करतो हे आपल्याला समजु शकते. तुळशीचे प्राशन करण्याचे अनेक लाभ तसेच उपयोग असतात, पण तुळशीच्या नुसत्या असण्यानेही आपल्या आजुबाजुची हवा ही शुद्ध होत असते तसेच त्यामुळे जंतुंचाही नाश होत असतो हे सिद्ध पण झालेले आहे.

तुळशीची पान,बिया अणि मुळ ही औषधात मुख्यत्वे वापरली जात असतात. तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. जसे की लघु, उष्ण, तीक्ष्ण, वखर वगैरे सर्व गुणांच्या योगी तुळशी अनेक कार्य करत असते, मात्र तुळशीमधील सर्वांत उपयुक्‍त अणि महत्वाचा गुण म्हणजे सुक्ष्म या गुणामुळे ती शरीरात प्रवेश केल्यावर लगेच तिच्या कामाला लागत असते. अणि आपले गुण दाखवत असते.

अनेक रोगांवर रामबाण औषध आहे तुळस
औषधी तुळस

आरोग्यासाठी तुळशीचे फायदे :–

तुळस ही आपल्यासाठी एक important medicine आहे. कारण तुळशीच्या पाने, मुळ, फुले, फांदया, बिजे आणि खोड यांचा वापर आपल्याला वेगवेगळया प्रकारे औषधी म्हणुन करता येत असतो.

१) कमी वयात वयस्करपणा वाढणे थाबवते :–

तुळशीमधील जीवनसत्वे अ आणि ब हे चांगले anti oxide ने भरलेले असतात म्हणुन आपल्या शरीराला टवटवीत आणि चमचमीत ठेवण्यास मदत ते करीत असतात. पाण्यासोबत तुळशीच्या पानांचे juice घेतल्यास शरीरातील विविध संस्था म्हणजेच organization व्यवस्थित कार्य करतात त्यामुळे शरीरास वृध्दावस्था म्हणजेच लवकर old होत नाही म्हणजेच म्हतारपण लवकर येत नाही.

२) दातांची निगा राखणे :–

तुळशीच्या पानांचा वापर दात दुखणे हिरडया कमजोर होणे, दातातुन रक्त येणे, दात कमजोर होणे,दात सडणे, या सर्वांसाठी केला जात असतो. तूळशीचे पान दहा मिनिट मिनीटे तोंडात ठेवल्यास चांगला फायदा मिळतो. आपल्या आयुर्वेद आणि इतर ग्रंथांमध्येही तुळशीला दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. एखाद्याचा दात ठणकत असेल तर तो चोळुन तुळशीचे पान त्याच्यावर ठेवल्यास त्या ठणकेवर आराम मिळत असतो.

३) लहान बाळाला ताप येणे :–

लहान बाळाला ताप आल्यावर तुळशीच्या तेलाने त्याला स्नान घालावे पण त्याआधी त्या बाळाच्या अंगाची तेलाने मालीश करायची याच्याने त्याचा ताप कमी होतो. कारण तुळशीत अशी काही प्रतिजैविके आणि वेदनानाशके असतात ज्यामुळे ताप आल्यावर तुळशीचे पान खाल्ल्याने आपल्याला आराम मिळत असतो.

४) तोंडाच्या समस्या दुर करणे :–

दातांची दुखापत, मुखाची दुर्गंधी, तोंडाला चव न येणे, तोंडाला अधुन मधुन कोरड येणे या सर्वांवर तुळशीचे पान चावुन खाल्ल्यावर फार आराम मिळत असतो. तुळशीचे पान हे एक उत्तम मुखशुध्दीदायक मानले जात असते. जुन्या काळात जेवणानंतर तुळशीच्या पानांचा स्वाद मुखशुध्दी साठी घेतला जायचा. तोंडातील सुज व फोड तुळस खाल्ल्यावर बरी होत असते .तोंडाच्या कँन्सरसाठी तुळशीचे पान खाणे आरोग्यास लाभदायक म्हटले जाते.

५) kidney स्टोन :–

तुळशीत toxic ingredients शरीराबाहेर टाकण्याचे गुण तसेच क्षमता असते त्यामुळे या गुणांमुळे तुळशीच्या पानांचा उपयोग मुत्रपिंडातील खडयांवर होतो. पहाटे पाणी न पिता पाच तुळशीची पाने खाल्ल्यास मुतखडा शरीराबाहेर टाकला जातो. तुळसपाने चावल्यामुळे लघवीत त्रास होत नाही. लघवी गरम होत नाही. त्यामूळे लघवी करताना वेदना कमी होण्यास फार लाभ मिळतो.

तर मित्रांनो आजचे तुम्हाला हे आर्टिकल जे औषधी तुळस महत्व उपयोग अणि फायदे बदल माहिती आवडली असेल अशा करतो, जर यात तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट बाक्स मध्ये आम्हाला सांगा अम्ही ही माहिती Update करून घेऊ . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी Tech Diary visit करा...
जय हिंद | जय महाराष्ट्र |

Leave a Comment

WhatsApp Group Join Now