शेतकरी कर्जमाफी योजना 2021 | महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

शेतकरी कर्जमाफी योजना 2021 । महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९

WhatsApp Group Join Now

Table of Contents

नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतकरी कर्जमाफी योजना 2021, या योजने चा GR पाहणार आहोत चला तर मग पाहू, आपल्याला सर्वाना चांगलेच माहीत आहे की आज आपल्या भारतातील शेतकर्यांचे काय हाल आहेत. शेतकर्यांची काय परिस्थिती आहे? पिकाला भाव नाही? शेतीला पाणी पुरेसे मिळत नाही. डोक्यावर त्यातच कर्जाचा मोठा डोंगर सावकाराकडे जमीन गहाण पडेल त्यातच मुलीच्या लग्नाचा खर्च अशी दविधा मनस्थिती अवस्था शेतकर्याची झालेली आपणास दिसुन येते. यामुळे ह्या जीवणाला कंटाळुन बहुतेक शेतकरी हे आत्महत्येचा पर्याय निवडतात. कारण त्यांची व्यथा तसेच वेदना समजून घेणारेच आज इथे कोणी नाही.

याचकरिता आपल्याला जागोजागी आज शेतकर्यांची आंदोलने होताना दिसुन येतात.शेतकरयांना कर्जमाफी करा त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळवुन द्यावा अशा मागण्या शेतकरी संघटना सरकारकडे करताना आपल्यास दिसुन येतात.पण सरकारकडुन अद्याप शेतकरींसाठी काही मदतीचा हात मिळालेला आपणास दिसुन येत नव्हता पण आता शेतकरयांसाठी आता एक नवीनच योजना आलेली आहे ज्यात सरकारने शेतकरयांसाठी १८० कोटीचा निधी मंजुर केला आपणास दिसुन येते आहे.

मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत महाराष्टातील बर्याच शेतकरयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे.पण आपल्यास असेही दिसुन येते की अद्याप काही शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यापासुन वंचितच राहिलेले आहेत.सुरुवातीपासुनच सरकारकडुन जसे जसे निधी मंजुर झाला तसा तसा शेतकरयांना टप्याट्प्याने कर्जमुक्तीचा लाभ मिळत आलेला आपणास दिसुन येते.

आता याच योजनेसाठी नवीन निधी सुदधा मंजुर करण्यात आला आहे.जे शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या लाभापासुन वंचितच आहेत त्यांना या कर्जमाफीच्या योजनेतुन लाभ मिळणार आहे.त्यासाठी नवीन यादी सुदधा लवकरच सरकारकडुन जाहीर होणार आहे.

त्याबाबत जाहीर झालेला जी आर पुढीलप्रमाणे :

सन २०२०-२०२१ मधील अर्थसंकल्पित तरतुदींचे वितरण करणेबाबद

महात्या ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
२०१९ (राज्यस्तर), (कार्यक्रम) (२४३५०१४२)
महाराष्ट शासन
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक कृकमा-०१२१/ प्र क्र १८/२_स
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई – 40003
दिनांक : 22 मे, 2020

वाचा :-

१) शासन निर्णय, सहकारी, पणण व वस्रउदयोग कृ कमा १२१९/प्र.क्र.१५७/2-स, दिनांक. २७.१२.२०१९
२) शासन पुरकपत्र, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र. कृ कमा १२१९/प्र.क्र.१५७/2-स, तद. १०.२.२०२०

प्रस्तावना :-

ता. दि. ०१.०४.२०१५ ते ता. दि. ३१.०३.२०१९ पर्यतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज
घेतलेल्या, तसेच, या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनग़ठण / फेर पुनगर्ठण
केलेल्या कर्जामधील ता. दि. ३०.९.२०१९ रोजी रु. २.०० लाखापर्यत थकीत व परतफेड न झालेली
रक्कम ऄसलेल्या थकबाकीदार शेतक-यांना दिलासा देण्यासाठी “महात्मा ज्योतीराव फु ले शेतकरी
कर्जमुक्ती योजना “2019” या कर्जमुक्ती योजनेचा निर्णय दिनांक. २४.१२.२०१९ च्या मंत्रीमंडळ बैठकीत
घेण्यात आला.

त्यानुसार दिनांक. २७.१२.२०१९ रोजी योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला
ऄसून योजनेची ऄंमलबजावणी सुरु अहे. आतापर्यत जवळजवळ १९ लाख खातेदारांना योजनेचा
लाभ देण्यात आला ऄसून उर्वरीतांनाही लाभ देण्याची कार्यवाही चालू आहे.

सदर योजनेचा उद्देश शेतक-यांना कर्जमुक्तीचा लाभ देऊन त्यांची कर्जखाती निरंक करुन
त्यांना खरीप 2020 हंगामा मध्ये पीक कर्ज उपलब्ध करुन देणे असा आहे. सदर योजनेमध्ये पात्र
खातेदाराची यादी प्रसिदध झाल्यानंतर यादीमधील खातेदारानी प्रमाणीकरण करणे अभिप्रेत आहे.
अशा प्रमाणीकरणानंतर ज्या खातेदारांनी प्रमाणीकरण केलेले आहे.

अशा खातेदारांच्या कर्जखात्यावर कर्जमुक्तीची रक्कम शासनातफे संबंधीत बँकांना देण्यात येते. मार्च, 2020 मध्ये सदर योजनेची अमलबजावणी सुरू असताना सद्यस्स्थतीत जगभर कोव्हीड-१९ (कोरोना वषाणू) मुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अतर्गत राज्यात दिनांक 24. 03. 2020 पासून ते दिनांक. 31 मे २०२० पर्यत लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. इतकेच नव्हेतर सदर साथीच्या रोगामुळे राज्याचे उत्पन्नाचे स्त्रोतही रोडावले आहे. तसेच, उपलब्ध ऄसलेला निधी या रोगावर उपाययोजनेसाठी वळवण्यात आला आहे ऄसे वित्त विभागाकडून कळत़वण्यात आले आहे.

निधीऄभावी “महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019” या योजनेमधील ईतरत्र पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे तुर्तास शक्य होणार नाही. सदर लाभार्थ्यांना योजनेऄंतगत लाभ मिळुन त्यांची खाती निरंक न झाल्यास त्यांना सद्यस्स्थतीत सुरु झालेल्या खरीप २०२० हंगामा मध्ये नवीन पीक कर्ज मिळू शकणार नाही.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकवीसचा चा उद्देश थकबाकीत ऄसलेल्या
शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देऊन, त्यांची कर्जखाते निरंक करुन त्यांना खरीप 2020 मध्ये पीक कर्ज घेण्यास पात्र करणे ऄसा आहे. ईपरोक्त वस्तुस्स्थती विचारात घेता सदर योजनेऄंतर्गत पात्र लाभार्थ्यांची खात लवकरात लवकर निरंक व्हावी व त्यांना खरीप दोन हजार वीस हंगामामध्ये नवीन पीक कर्ज मिळावे यासाठी बँकांना उपदेश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या कर्जमुक्ती योजने अतर्गत शासनाकडुन प्रसिदध केलेल्या लिस्टमधील ज्या शेतक-यांच्या कर्जखात्यात कर्ज माफीच्या लाभाची रक्कम अजुनही जमा झालेली नाही अशा खात्यांबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यास शासन मान्यता देण्यात येत अहे.

अ ) जिल्हा मध्यवती सहकारी बँकेतील खाती :-

१) महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस या कर्जमुक्ती योजने अंतर्गत शासनाकडून योजनेच्या portal वर प्रसिदध केलेल्या यादीमधील ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या कर्जखात्यावर योजनेंतर्गत लाभ देण्यात आला नाही अशा लाभार्थ्यांना थकबाकीदार न मानता खरीप 2020 साठी पीक कर्ज द्यावे.

२) जिल्हा मध्यवती सहकारी बँकांनी कर्जमुक्ती योजने अंतर्गत वर नमूद केलेल्या थकबाकीदार शेतक-यांच्या कर्ज खात्यावर योजनेऄंतगत निर्गमित केलेल्या यादीमधील थकबाकीची रक्कम शासनाकडून येणे दर्शवावी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी या ऄनुषंगानेसंबंधीत विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना कळवावे.

संबंधीत विविध कार्यकारी सहकारी संस्था यांनी ऄशा शेतक-यांच्या कर्जखात्यावर असलेली रक्कम “शासनाकडून येणे दर्शवावी” व त्यांनी अशा शेतक-यांस खरीप दोन हजार वीस साठी पीक कर्ज द्यावे.

३) शासनाकडून येणे रकमेवर वर नमूद के ल्या प्रमाणे जिल्हा मध्यवती सहकारी बँकांनी दिनांक 01.04.2020 पासून सदर रक्कम त्यांना प्राप्त होण्याच्या दिनांकापर्यत, जिल्हा मध्यवती सहकारी बँकांनी त्यावर व्याज आकारणी करावी. शासनाकडून संबंधित जिल्हा मध्यवती सहकारी बँकेस ऄसा निधी व्याजासह देण्यात येईल.

मात्र सदर योजनेमध्ये पोर्टलवर प्रसिदध केलेल्या यादीमधील ज्या शेतकर्यांच्या कर्जखात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱयांना संबंधित जिल्हा मध्यवती बँकांनी खरीप 2020 साठी पीक कर्ज उपलब्ध करून दिल्यास, अशाच खातेदारांच्या कर्जमुक्ती योजनेंतर्गत शासनाकडून देय असलेल्या रकमेद्वारे सरकार संबंधित जिल्हा मध्यवती सहकारी बँकांना व्याज देईल.

ब) व्यापारी बँका व ग्रामीण बँकेतील खाती :-

१) महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या कर्जमुक्ती योजनेऄंतगत शासनाकडून योजनेच्या portal वर प्रसिध्द केलेल्या यादीमधील लाभार्थ्यांच्या कर्जमाफीची रकम व्यापारी बँका व ग्रामीण बँका यांनी “शासनाकडून येणे दर्शवावे” तसेच, व्यापारी व शासन निर्णय क्रमांकः कृ कमा १२1९/ प्र.क्र.1५7/2-स पृष्ट्ठ 4 पैकी 3 ग्रामीण बँकामध्ये शेतक-यांच्या NPA कर्जखात्यावर शासनाकडून ऄशा कर्जखात्यांवर देय असलेली रक्कम “शासनाकडून येणे दर्शवावी” व याशिवाय ऄशा NPA कर्ज खात्यांवर बँकांनी सोसावयाची रक्कम (Hair cut) याचा ऄशा कर्ज खात्यामध्ये ऄंतर्भाव करावा.

२) व्यापारी बँका व ग्रामीण बँकांनी तात्काळ लाभार्थी शेतक-यांना खरीप दोन हजार वीस साठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे.

३) व्यापारी बँका व ग्रामीण बँकांनी लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यावर शासनाकडुन येणारी रकमेवर वर नमूद केल्याप्रमाणे देय ऄसलेल्या रक्कमेवर दिनांक 01. ४ दोन हजार वीस पासून त्यांना सदर रक्कम प्राप्त होण्याच्या दिनांकापर्यत, ऄशा बँकानी त्यावर व्याज आकारणी करावी.

शासनाकडून संबंधित व्यापारी व ग्रामीण बँके ऄसा तन व्याजासह देण्यात येईल. मात्र सदर योजनेमध्ये पोर्टलवर प्रसिसद्ध केलेल्या यादीमधील ज्या शेतकर्यांच्या कर्जखात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नाही ऄशा शेतकऱयांना संबंधित व्यापारी बँका व ग्रामीण बँकांनी खरीप दोन हजार वीस साठी पीक कर्ज उपलब्ध करून दिल्यास, ऄशाच खातेदारांच्या
कर्जमुक्ती योजनेंतगत शासनाकडून देय ऄसलेल्या रकमेवर शासन संबंधित व्यापारी बँक व ग्रामीण बँक यांना व्याज देईल.

योजनेच्या ऄंमलबजावणीची कार्यवाही यापुर्वी विहीत केल्यानुसार उपरोक्त बदल विचारात घेऊन करण्यात यावी. सदर बदलाच्या ऄनुषंगाने ऄंमलबजावणी करत ऄसताना आवश्यकता भासल्यास विभागांमार्फत विविध घटकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात येतील. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या ऄनौपचारीक संदर्भ क्रमांक 161/2020/व्य.2 ता. दि.14/5/दोन हजार वीस ऄन्वयेप्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्लु डबलु महाराष्ट गर्वमेंट डाँट इन संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला ऄसून त्याचा संगणक सांके तांक क्रमांक 2005221305057802 असा आहे. हा सरकारचा निर्णय d-जीटल पदधतीच्या सहीने सादर करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.
( रमेश शिंगटे )
अवर सचिव तथा सहसबंधक,
सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन
प्रत,
1) मा. मुख्यमंत्री यांचेऄपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
2) मा. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
३) माननीय विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य (सर्व)
५) मा. ऄपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
६) सहकारी आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे
७) मुख्य महाप्रबंधक, भारतीय रिझर्व्ह बँक, कें द्रीय कार्यालय, मुंबई
८) मुख्य महाप्रबंधक, नाबार्ड प्रादेशिक कार्यालय, पुणे
९) अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई
10) चेअरमन, राज्य स्तरीय बँकर्स समिती, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे.
11) विभागीय आयुक्त, (सर्व)
12) जिल्हाधिकारी (सर्व)
१3) विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (सर्व)
14) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, (सर्व)
15) जिल्हा कोषागार अधिकारी, (सवज)
1६) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवती सहकारी बँक (सर्व)

अशा प्रकारे शेतकरी कर्जमुक्तीसाठी शासनाने काढलेली नवीन निधी योजना अणि तीचा जी आर आहे.

जी. आर. पाहण्यसाठी या लिंक वर जा.

तर मित्रांनो आजचा तुम्हाला हे आर्टिकल जे शेतकरी कर्जमाफी योजना 2021 बदल माहिती आवडली असेल अशा करतो, जर यात तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट बाक्स मध्ये आम्हाला सांगा अम्ही ही माहिती Update करून घेऊ . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी Tech Diary visit करा...
जय हिंद | जय महाराष्ट्र |

Leave a Comment

WhatsApp Group Join Now