Bitcoin म्हणजे काय? | cryptocurrency म्हणजे काय?| What is Bitcoin in Marathi

Bitcoin म्हणजे काय? | क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? | Crypto Currency | best crypto to invest 2022

WhatsApp Group Join Now

Table of Contents

Bitcoin म्हणजे काय? | What is Bitcoin in Marathi

बिटकोईन (Bitcoin) ही एक नावाजलेली व्हर्च्युअल करन्सी (आभासी चलन) आहे. 2008 साली सतोषी नाकामोटो यांनी ब्लॉकचैन आणि क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञान वापरून बिटकोईनला सुरुवात केली. बिटकॉइनची किंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

आपल्याकडे रुपयांच्या खाली सर्वात छोटे एकक जसे पैसे असतात त्याचप्रमाणे बिटकोईन मध्ये छोटे एकक हे सातोशी आहे. 1 बिटकोईन हा 10 करोड सातोशी पासून बनतो.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? | What is Crypto Currency in Marathi

क्रिप्टोकरन्सी म्हणजे असे चलन ज्याचे अस्तित्व नाहीये किंवा आपल्याला ते हातात घेता येत नाही मात्र तरी देखील आपण त्याने व्यवहार करू शकतो. क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) या विकेंद्रीकरणाचा वापर करत आहेत. म्हणजेच याचा संपूर्ण मालकी हक्क कोणा एका व्यक्तीकडे किंवा सत्तेकडे नसून जरी नोटबंदी सारख्या समस्या आल्या तरी देखील याला काही धोका नसतो.

क्रिप्टोकरन्सी या कमी प्रमाणात लॉन्च केल्या जातात आणि त्यामुळे त्यांची किंमत वेळेनुसार आणि गुंतवणूक वाढत गेल्याने वाढतच जाते. आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न कमी कालावधीत जर हवा असेल तर क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency binance official website) हा एक मार्ग आहे.

Aman Gupta Biography, Net worth, Early Life, Career, Family | अमन गुप्ता बायोग्राफी

बिटकोईन निर्मिती कशी केली जाते?

बिटकोईन निर्माण करण्याच्या प्रक्रियेला बिटकोईन (Bitcoin) मायनिंग असे म्हणतात. बिटकोईन मायनिंग करणे तसे सोपे नाहीये मात्र एखाद्याकडे चांगल्या दर्जाचा सेटअप असेल तर तो हे काम करू शकतो. बिटकोईन मायनिंग ही कमी प्रमाणात होत असल्याने आणि त्याची मागणी वाढतच असल्याने आता बिटकॉईनच्या किंमती 60 लाखांच्या घरात जाऊन आलेल्या आहेत.

बिटकॉइन फायदे व उपयोग | Advantages of Bitcoin in Marathi | बिटकॉईन काय आहे? बिटकॉईन चे फायदे आणि तोटे!

बिटकॉइनचा (Bitcoin) वापर हा आता अनेक देशांमध्ये चलन म्हणून केला जातो आहे. आता यामध्ये तिथल्या सरकारचे नियंत्रण नसल्याने किंवा कमी असल्याने अनेक देशांनी याच्या वापराला परवानगी दिलेली नाही. आपल्या बँकेतून जर आपण एखाद्याला पैसे दिले किंवा घेतले तर आपला रेकॉर्ड त्या बँकेकडे किंवा बँकेच्या लेजर मध्ये तसाच पडून असतो. म्हणजे आपण किंवा इतर कोणी बँकेचा व्यक्ती देखील कधीही ते बघू शकतो. मात्र बिटकोईनच्या माध्यमातून होणारे व्यवहार हे प्रायव्हेट लेजरचा भाग असतात. त्यांना ज्याने पैसे पाठविले तो आणि ज्याने पैसे प्राप्त केले तो असे दोनच व्यक्ती बघू शकतात. या मुळे तुमचे व्यवहार अधिकाधिक गोपनीय होतात.

आभासी विश्वात आपल्याला बिटकोईनचा (Bitcoin) सर्वात जास्त वापर करता येणार आहे. यामुळे बिटकोईन ही करन्सी भविष्यातील करन्सी म्हणून ओळखली जाते आहे.

11 Intraday Rules in Marathi | टॉप ११ इंट्राडे ट्रेडिंग नियम | इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय?

बिटकॉइन लीगल आहे का? | bitcoin is legal in India in Marathi

अनेकांच्या मनात हा संभ्रम आज देखील आहे की बिटकोईन लीगल आहेत का? जर सोप्या भाषेत उत्तर द्यायचे झालेच तर बिटकोईन (Bitcoin) आणि त्या देशाचे सरकार यावर हा निर्णय अवलंबून आहे. भारतात काही काळापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिटकोईन लीगल नसल्याची घोषणा केली. मात्र आता 2022 च्या अर्थसंकल्पात बिटकोईन वर 30% कर आकारण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला आहे.

भारतात जर क्रिप्टोकरन्सी वर कर आकारला जातो आहे तर आपण त्याला एक प्रकारे लीगल म्हणू शकतो. मात्र तरी देखील अजूनही या बाबतीत स्पष्ट विधान करणे चुकीचे आहे.

भारत सरकार आणि आरबीआय मिळून आता स्वतःचा एक डिजिटल रुपया आणणार आहे. ही भारत देशाची स्वतःची एक ऑफिशियल क्रिप्टोकरन्सी असेल. याने होणाऱ्या व्यवहारांवर देखील कर लागणार का? या विषयी मात्र अजून काही स्पष्टता नाही.

महाराष्ट्र किमान वेतन 21-22 | Minimum Wages in Maharashtra January 21-22

अनेक देशांमध्ये बिटकोईनला परवानगी दिलेली आहे. टेस्ला सारख्या कंपनीने बिटकोईन (Bitcoin) आणि नंतर शिबा सारखे कॉइन वापरून व्यवहार करण्यास सहमती दिली आहे.

बिटकोईन मध्ये गुंतवणूक

बिटकोईन मध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर सध्या आपण 100 रुपयांपासून पुढे गुंतवणूक करू शकतो. अनेक भारतीय आणि विदेशी प्लॅटफॉर्म देखील आता बाजारात उपलब्ध आहेत. हे मुख्यतः एक्सचेंज आणि वॉलेट्स असतात.

बिटकोईन मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आधी त्यातील धोके आणि मुख्य माहिती जाणून घ्या. बिटकोईन ही पूर्णपणे विकेंद्रित क्रिप्टोकरन्सी असली तरी देखील एका व्यक्तीकडे याचा मोठा भाग असू शकतो. त्यामुळे जर आपण बिटकोईनला एक मुख्य गुंतवणूक म्हणून बघत असाल तर त्या व्यक्तीच्या एका निर्णयाने तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकते. शेअर मार्केट प्रमाणे यावर देखील बाजारातील चालू घडामोडींचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. अनेकदा काही ही पूर्वकल्पना नसताना अचानक बिटकॉइनचा दर हा 40 ते 50% देखील कोसळलेला आहे.

हर्षद मेहता स्टोरी इन मराठी | Harshad Mehta Story in Marathi | Harshad Mehta Scam

बिटकोईनचे नुकसान

बिटकोईन वर कोणत्याही प्रकारे नियंत्रण नसल्याने बिटकॉइनचा वापर हा अनेकदा चुकीच्या कामांसाठी केला जातो आहे. डार्क वेब सारख्या ठिकाणी सर्व व्यवहार हे बिटकोईन सारख्या क्रिप्टोकरन्सीच्या (cryptocurrency) माध्यमातून होत आहेत.

आपले बिटकोईन वॉलेट्स हे आपल्यासाठी इथे सर्व काही असतात. त्यामुळे आपल्या वॉलेटचा पासवर्ड विसरणे किंवा एखाद्याला समजणे किती धोकादायक आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल.

Leave a Comment

WhatsApp Group Join Now