Basic Salary Gross Salary Net Salary म्हणजे काय? | CTC अर्थ काय आहे? | basic salary percentage in ctc
तुमच्या पैकी बहुतेकजण तुमचे शैक्षणिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असतात. काहींना लवकर नोकरी मिळते तर काहींना उशिरा, नोकरीत रुजू होऊन एक महिना पूर्ण झाल्यानंतर मूळ वेतन हे आमच्या खात्यात येते. या सोबतच पगाराची स्लिप ही हातात येते. आज आपण या पोस्टद्वारे जाणून घेणार आहोत की Basic Salary, Gross salary, Net salary म्हणजे काय? आणि वेतन किती आहे कसे जाणून घ्यावे?
Basic Salary Gross Salary Net Salary म्हणजे काय? | Gross salary vs basic salary in Marathi
अनेक ठिकाणी आज महाराष्ट्रात आउट सोर्सिंग किंवा कंत्राटी काम केले जाते, तेथे क्वचितच कुणालाही खात्यात पगार दिला जात नसेल. पण कायद्यानुसार खाते नसेल तर पगार हा चेकने देण्याचा नियम आहे, आणि त्या सोबत सॅलरी स्लिपही हे भेटत नसेल तर मागणी करता येते. आज या लेखाद्वारे आपण त्याच पगाराच्या रचनेबद्दल योग्य अशी माहिती आपणास देणार आहे. मला आशा आहे की तुम्ही ते पूर्ण वाचाल आणि त्याचा फायदा घ्याल.
Related Posts:
सर्व नोकरदारांनी पगार स्लिप (salary Slip) पाहिली असेलच, वर दिलेली वेतन रचना पगाराची रचना (Structure) समजून घेणे हे सोपे करेल. या सॅलरी स्लिप मध्ये फारसे लपण्यासाखे काही नाही. आजकाल कंत्राटी किंवा आउटसोर्स कर्मचार्यांना समान पगार स्लिप देण्याचा ट्रेंड आहे. आपण पगाराच्या सर्व मुख्य घटकांबद्दल (Components) चर्चा करू, आपण एक एक करून जाणून घेऊ.
‘पगार’ म्हणजे काय? (‘Salary’ म्हणजे काय?)
पगार ही रक्कम आहे जी कोणतीही कंपनी तिच्या कर्मचार्यांना कामाच्या बदल्यात देत असते. पगाराच्या या रकमेत पगाराचे सर्व घटक (Components) उपलब्ध आहेत. कंपनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार त्यांच्या मुलाखती आणि चाचण्यांद्वारे विविध पदांसाठी नियुक्त करते. यासोबतच त्यांच्या कामाच्या आणि पात्रतेच्या आधारावर त्यांना पगार म्हणून ठराविक रक्कम हि दिली जात असते.
Salary हा शब्द लॅटिन शब्द ‘Salarium’ वरून आला आहे. पूर्वी रोमन सैनिकांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात मीठ दिले जात असे, परंतु जेव्हा अधिकाऱ्यांना मीठ वाहतूक करणे आणि जतन करणे कठीण झाले तेव्हा त्यांनी त्या वस्तूच्या बदल्यात पैसे देऊ केले. कामाच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशाला ‘Salarium’ किंवा सॉल्ट-मनी असे संबोधले जात असे. ज्याला आधुनिक इंग्रजीत ‘salary’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
मूळ वेतन म्हणजे काय? (What is Basic Salary)
तुमचे खरे उत्पन्न हे फक्त मूळ वेतन आहे. हा पगार आहे जो कंपनी कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या गुणवत्तेनुसार आणि कामाच्या आधारावर देत असते. दुसऱ्या शब्दांत, मूळ वेतन ही एक निश्चित रक्कम आहे जी कोणत्याही कंपनीद्वारे कर्मचार्यांनी केलेल्या कामासाठी दिली जाते. कंपनीने दिलेल्या बोनस, नफा किंवा इतर कोणत्याही भरपाई मध्ये मूळ वेतन समाविष्ट नसते.
मूळ वेतनामध्ये बोनस, इ. फायदे किंवा कंपनीने दिलेली इतर कोणतीही भरपाई समाविष्ट नसते. अनेक कंपन्या वार्षिक वेतनवाढ देऊन मूळ पगारही वाढवतात, पण त्याची गरज नसते. कोणतीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना पदानुसार वेतन किंवा मूळ वेतन निश्चित करते. आता नावाप्रमाणेच, बेसिक सॅलरी (मूळ वेतन) हा कर्मचाऱ्याचा मूळ पगार आहे. तज्ज्ञांच्या मते, मूळ वेतन उद्योगाच्या प्रकारानुसार बदलते.
Basic Salary ची गणना कशी करायची? | basic salary percentage of gross salary
तुम्ही तुमच्या सॅलरी स्लिप मध्ये पाहिल्यास तुम्हाला दोन कॉलम सापडतील. एक पेमेंट (Payment) आणि दुसरी वजावट (Deduction). यामध्ये, पेमेंट म्हणजे तुमच्यासाठी कंपनीने निश्चित केलेली रक्कम आणि वजावट म्हणजे, तुमच्या पेमेंट मधून वजावट जसे की पी. एफ, ई.एस. आय, कर इ.
तुमच्या पगाराच्या पेमेंट पर्याया मध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी असतील –
- मूळ वेतन (Basic Pay)
- ग्रेड पे (Grade Pay)
- महागाई भत्ता (D.A.)
या व्यतिरिक्त, काही अतिरिक्त भागाचा पगारामध्ये समावेश केला जाऊ शकतो –
- घरभाडे भत्ता (House Rent Allowance)
- अंतरिम मदत (Interim Releaf )
- अपंग भत्ता ( Handicapped Allowance)
- इ. मूलभूत पगार तुमच्या Monthly CTC च्या जवळपास 30-40% असू शकतो. उदा – बेसिक = CTC (Monthly) * 30-50 / 100 = .
उदाहरणासाठी वर दिलेली सॅलरी स्लिप. त्यात Basic मध्येच DA (महागाई भत्ता) जोडण्यात आला आहे.
तुमच्या पगारातील DA आणि HRA चा फार्मूला –
- DA महागाई भत्ता = (मूलभूत वेतन + ग्रेड वेतन) x DA%
- HRA भाडे भत्ता = मूळ वेतन + ग्रेड वेतन) x HRA%
मूळ पगार (Basic Salary) आणि एकूण पगारात (Gross Salary) काय फरक आहे?
मूळ वेतन म्हणजे कंपनी किंवा नियोक्त्याने कर्मचाऱ्याला दिलेला पगाराचा दर. यात ओव्हर टाईम किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त भरपाईचा समावेश नाही. तर एकूण पगार ही कर्मचाऱ्याच्या प्रत्येक कर किंवा इतर कपाती पूर्वीची रक्कम आहे, आणि त्यात ओव्हर टाइम वेतन आणि बोनस समाविष्ट आहे/असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा रु.40,000 असेल. ज्या मध्ये त्याचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे. या मध्ये घरभाडे भत्ता, वाहन अशा इतर भत्त्यां सोबतच त्यांना १८ हजार रुपये पगार मिळणार.
Basic Salary Gross Salary Net Salary म्हणजे काय? आणि पगाराची गणना कशी करायची?
Net Salary/ In hand Salary म्हणजे काय?
कर्मचार्यांच्या एकूण पगारातून पी. एफ, ई. एस. आय, कर आणि इतर वैधानिक कपात केल्या नंतर, निव्वळ वेतन शिल्लक उरते. त्यांना नेट सॅलरी/ इन हॅन्ड सॅलरी (Net Salary/ In hand Salary) म्हणतात. निव्वळ पगार हा कर्मचाऱ्यांचा टेक होम पगार आहे. जी कंपनी दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करते.
हे ही वाचा –
- online PF कसा काढावा?
- महाराष्ट्रातील 2021-2022 किमान वेतन कायदा जाणून घ्या.
- सलमान खानला साप चावल्याची बातमी: रुग्णालयात दाखल, काय झाले ते जाणून घ्या.
तुमच्याकडे कामगारांशी संबंधित कोणतीही माहिती, लेख किंवा प्रेरणादायी संघर्ष कथा असेल जी तुम्हाला आम्हा सर्वांसोबत शेअर करायची असेल, तर आम्हाला ईमेल करा – mhnewsnet@gmail.com.
TechDiary.in सुरळीतपणे चालवण्यासाठी, कृपया आर्थिक मदतीसाठी खालील नंबर वर गुगल पे करा –
+91 94222 71512