पाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती | औषधी वनस्पतींची नावे व उपयोग | Medicinal plants Information

पाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती | औषधी वनस्पतींची नावे व उपयोग| दैनंदिन जीवनातील औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग काय ?

WhatsApp Group Join Now

Table of Contents

कडूनिंब | तुळस | कोरफड (कुमारी) | अडुळसा | कुडा

वरील औषधी वनस्पतीं द्वारे आपल्या दैनंदिन जीवनात केले जाणारे काही सोपे घरगुती उपाय :—

आपल्या भारता देशात औषधी वनस्पती ( Medicinal Plants Information) ह्या आज फारच मुबलक अणि थोडया प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आपली health टिकविण्यासाठी आणि थोडक्यात घरगुती उपचार करुन आजार बरा करण्यासाठी करत असतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखरच एक हिरवळ देवता म्हणता येईल. अणि आज आता आपण त्यातल्या काही पाच अत्यंत महत्त्वाच्या वनौषधींबद्दल माहिती जाणुन घेणार आहोत.

Protein Rich Food In Marathi | 10 प्रोटीन युक्त आहार, जे तुम्ही दररोज खाऊ शकता | Protein rich food veg in marathi

कडूनिंब औषधी वनस्पती | कडू लिंबाच्या पानाचे फायदे आणि नुकसान | निरोगी आरोग्यासाठी कडुनिंबाचे ६ औषधी फायदे

निरोगी आरोग्यासाठी कडुनिंबाचे ६ औषधी फायदे
निरोगी आरोग्यासाठी कडुनिंबाचे ६ औषधी फायदे

औषधी वनस्पती

जसे की कडूनिंब हे वृक्ष सर्वांच्याच ओळखीचे आहे. त्याची पाने, फळे, तसेच खोड औषधी आहेत. इसबासारख्या त्वचेच्या रोगाकरता याच्या पानांचा उपयोग होतो. कडूलिंबाच्या पानांच्या तेलाचा उपयोग खाज आणि जखम भरून काढण्यासाठी करतात.

तसेच या पानांना उकळून घेऊन त्याचा औषधी काढा करूनही आपल्याला ते वापरता येतात. कडूनिंब हे एक दर्जेदार जंतुसंसर्गनाशक तसेच कीटकनाशक आहे. त्याच्या खोडाच्या बाहय भागाचा काढाही ब-याच आजारांवर उपायकारक ठरत असतो. या झाडाची लागवड करणे आणि त्याची काळजी घेणे हे आपल्या खुप फायद्याच आहे. कडूलिंबाचे तेल हे आपण असे तयार करावे की कडूलिंबाच्या पानांचा त्यात पाणी टाकुन १०० मि.लि. ताजा रस काढायचा. अणि त्यात 25 मि.लि. तिळाचे तेल घालायचे. मंद आचेवर ते झाकून उकळुन घ्यावे. साधारणत अर्ध्या तासात त्यातील पाण्याचा भाग निघून जात असतो.

मग उरलेले मिश्रण थंड करून गाळुन घ्यायचे. हे तेल घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवल्यास वर्षभर सहज टिकुन राहते. जखमेच्या जागी हे लावल्यास ती जागा लवकर बरी होते. बाळंतपणातल्या जखम बरी होण्याकरीता साठी सुदधा कडूनिंबाची पाने घातलेल्या गरम पाण्याच्या टपमध्ये रोज 15 मिनिटे बसणे.

तुळस औषधी वनस्पती | औषधी वनस्पती तुळस मराठी माहिती

तुळस म्हणजे ‘वनस्पती लहान पण गुण महान’ असे आहे. तुळशीची पाने ही सर्दी खोकल्यासाठी विशेष गुणकारी आहेत. तुळस च्या पानांचा रस मधात मिसळुन किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी दिला जात असतो. तुळशीची पाने उष्ण असतात म्हणून ती कफदोषामध्ये जास्त प्रमाणात वापरतात.

ही पाने आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो. या उलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणा-या असतात. म्हणून हे असे उष्णतेचे दोष घालवण्यासाठी जसेकी(पित्तदोष) म्हणजे, जळजळ, पायांची आग होणे, तोंड येणे, नाकातून रक्त वाहणे,रक्ती मुळव्याध, इत्यादींसाठी घेत असतात. ह्या बिया दूध, किंवा तुपाबरोबर घ्याव्यात. 20 ते30 बिया पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवायच्या आणि एका वेळी घ्यायच्या.

Omicron म्हणजे काय? | Covid New Variant in Marathi | SARS-CoV-2 Variant (B.1.1.529) संपूर्ण माहिती.

असे दिवसातून तीन चार वेळा करावे. सर्दी आणि तापाकरता तुळशीचा रस काढणे – एक कप तुळशीची पाने पाच मिनिटे पाण्यात भिजवायची. मग ती वाटून कापडातून गाळायची. याचा 20 मि.लि. म्हणजे साधारण अर्धा कप, इतका रस काढायचा. अणि तेवढा रस होण्याकरता जेवढी लागतील तेवढी पाने घ्यावी. 

हा मोठया माणसांकरता एक वेळचा डोसच आहे. तो सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे तीन दिवस घ्यायला. सर्दी आणि तापाकरता ह्याचा उपयोग होत असतो.

तुळशीच्या अनेक जाती प्रसिद्ध आहेत. त्यातील काहींची नावे अश्याप्रकारे आहेत : –

 1. औषधी तुळस .
 2. कृष्णा तुळस .
 3. कपूर तुळस.
 4. काळी तुळस / सब्जा / 
 5. पंजाबी तुळस.
 6. राम तुळस.
 7. लवंग तुळस.
 8. नील तुळस.
 9. रान तुळस.
 10. लक्ष्मी तुळस.
 11. ज्ञान तुळस.
 12. श्वेत तुळस.
 13. रक्त तुळस.

कोरपड/तुळस औषधी वनस्पती | औषधी वनस्पती तुळस मराठी माहिती
कोरपड/तुळस औषधी वनस्पती | औषधी वनस्पती तुळस मराठी माहिती

कोरपड/तुळस औषधी वनस्पती

कोरपड औषधी वनस्पती | औषधी कोरफडीचे फायदे व माहिती | Aloe Vera Benefits and Information | Aloe Vera Information in Marathi

कोरपड (कुमारी) या वनस्पतीचा वापर हा जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी म्हणुन उत्तम होऊ शकतो. जखमेच्या आकाराचा कोरफडी चा तुकडा कापा.जखम धुऊन घ्या. तुकडयाची ओली बाजू जखमेवर ठेवा वरून त्यावर पट्टी बांधा. कोरफड पट्टी रोज बदला. याने जखम लवकर बरी होईल. 

भाजल्यामुळे झालेल्या जखमांवरदेखील कोरफडीची मलमपट्टी लागू पडते. ब-याच आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफडीचा उपयोग केला जातो. यकृताच्या व्याधी स्त्रियांचे रोग आणि खोकला यांवर सुदधा हे खूप गुणकारी आहे.

म्हणुन आपणही कोरफड आपल्या बागेत तसेच घरासमोर लावूयात आणि लोकांनाही ती लावायला सांगूयात. कोरपड ही दणकट असते आणि वर्षानुवर्षे वाढते तसेच टिकतेही.

अडुळसा औषधी वनस्पती | अडुळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो ?

अडुळसा ह्य झुडुपाचा वापर खोकला बरा करण्यासाठी करतात. अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस खोकल्यासाठी घेतला जातो. तसेच तो रस मधाबरोबर सुदधा दिला जातो. ५० ते ६० अडुळशाची पाने स्वच्छ धुवावी, ती एक लीटर पाण्यातमध्ये अर्ध्या तासासाठी मंद आचेवर उकळावीत. 

साधारण पावपटच पाणी त्यात उरले पाहिजे. हा काढा थंड करून मग गाळून ठेवुन द्यावा. अणि कोणाला खोकला झाल्यास २० m.l. काढा हा दिवसातून २ ते ३ वेळा या प्रमाणात 3 दिवस द्यावा. लहान तसेच मोठया व माणसांना हा काढा फारच उपयुक्त आहे. हा असताना आपल्याला इतर खोकल्याच्या बाटल्यांची अजिबात आवश्यकता पडत नाही.

कुडा औषधी वनस्पती

कुडा हे जंगलात सापडणारं झाड आहे. त्याची शेंगेसारखी पिके पिकल्यावर काळी होतात ही फळे एकमेकांसोबत जोडीने लटकलेली असतात. म्हणून ती आतमध्ये जोडलेल्या दोन शेवगाच्या शेंगांसारखी दिसता. या झाडाच्या खोडाचे साल औषधी असते. जुलाब आणि आव यासाठी ते वापरतात. खोडाच्या सालीचा एक टुकडा कुटून त्यात एक चमचा मध मिसळून औषध तयार केले जाते. कुडयाचा काढादेखील करतात. १६ कप पाण्यामध्ये तिचे एक कप कूट घालून मिश्रण चार कप होईपर्यंत उकळा. गार करून बाटलीत भरून ठेवा. एका माणसाला एका वेळी 20 मि.लि. काढा, दिवसातून तीनदा द्यावा.

Protein Rich Food In Marathi | 10 प्रोटीन युक्त आहार, जे तुम्ही दररोज खाऊ शकता | Protein rich food veg in marathi

काही सोपे घरगुती उपाय

 • 1. हळद : ही एका वनस्पतीच्या कंदाची पूड असते. आपल्या देशातमध्ये ती जेवणात वापरतात आणि औषध म्हणूनही तिचा उपयोग केला जातो. शेकडो वर्षापासून तिचे औषधी गुण आपल्या सगळयांना माहीत आहेत. हळदीची पुड ही रक्त थांबाण्यासाठी आणि जखम बरी करण्यासाठी मदत करते. खरचटणे किंवा कापणे याच्यावरही आणि तेल लावण्याची रीत आहे. स्नान करताना दूध बेसन आणि हळदीचा लेप लावण्याची देखील रीत आहे.

 • २. त्रिफळा : चुर्ण पावडर ही आवळा, हिरडा आणि बेहेड या तीन फळांचे एकत्रित अणि औषधी मिश्रण असते. बध्दकोष्ठता,मधुमेह तसेच वजन कमी करण्याकरसाठी याचे चुर्ण घेतात. अणि ते बाहेरून शरीरास लावल्यास जखम भरून निघण्याकरता देखील हे उपयुक्त असते. स्नान करतेवेळी त्रिफळा चुर्ण लावले तर त्वचेसाठी देखील याचा उपयोग होतो. हे चुर्ण दात घासण्यासाठी सुदधा वापरतात. घशावर सूज आल्यावर, हिरडयातून रक्त वाहत असल्यास किंवा तोंड आल्यास याच्या काढयाने गुळण्या केल्या जातात.

 • ३. खो. तेल : सांधेदुखीसाठी तेलाने मालिश करणे अधिक चांगले. पण याचबरोबर आपल्याला औषधांची सुदधा गरज असते.

 • ४. ज्येष्ठमध ही एक अतिशय गुणकारी वनस्पती आहे. हिच्या सुक्या काटक्या देखील मिळतात. घसा बसल्यावर याच्या खोडाची पुड मधात कालवून दिली जाते. ही पूड वरवरचा घशातील खोकलाही बरा करते. गाईच्या दुधाबरोबर पुड घेतल्यावर मेंदूची क्षमता वाढण्यास याचा वापर होतो. ही वनस्पती शरीरात शितलता निर्माण करणारी असते. म्हणूनच पित्तदोषाच्या आजारांवर याचा वापर अधिक करतात.

 • 5. चमकदार त्वचेकरता ज्येष्ठमध पुड आणि हळद दुधात कालवून लावयला हवी. शतावरीची पुड दुधाबरोबर घेतल्यास शक्तिवर्धक औषधासारखा वापर होतो आणि आरोग्यही सुधारते.

 • 6. आम्ल पित्तासाठी आवळयाची पुड ही तुपात कालवली जाते अणि मग ती पोटात घेतली जाते.

 • ७. पोटात जळजळीसाठी गुलकंद आणि तुप उपयुक्त असते.

 • 8. कोरडया खोकल्यासाठी उष्म किंवा कोमट पाणी प्यायला हवे.

 • 9. अणि जुलाब होत असल्यास शरीरातील पाणी भरून काढण्यासाठी लिंबुचा रस, साखर आणि मीठ घ्यायला हवे.

 • 10. कोरडया खोकल्यासाठी मध एकदम चांगले. इतर औषधे मधात घोळुन देण्यासाठी पण वापर होतो.

 • 11. तुमचे वजन कमी असल्यास ते वाढवण्याकरता तुम्ही दुध आणि तुप घेणे तुमच्यासाठी फार उपयुक्त आहेत.

 • 12. झोप लागत नसेल, तर तेलाने डोक्याला मालिश करावी. तसेच गायीच्या तुपाने तळपायाला मालिश करायची. वनौषधींबद्दल अधिक माहिती आपल्याला इतर व्याधी आणि विषयांच्या माहितीसोबत मिळतेच.

तर मित्रांनो आजचा तुम्हाला हे आर्टिकल जे पाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती बदल माहिती आवडली असेल अशा करतो, जर यात तुम्हाला काही शंका असल्यास कृपया खाली कॉमेंट बाक्स मध्ये आम्हाला सांगा अम्ही ही माहिती Update करून घेऊ . अशेच नवनवीन पोस्ट वाचण्या करिता आमचं ब्लॉग ला नेहमी Tech Diary visit करा...
जय हिंद | जय महाराष्ट्र |

2 thoughts on “पाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती | औषधी वनस्पतींची नावे व उपयोग | Medicinal plants Information”

Leave a Comment

WhatsApp Group Join Now