New Year 2024: 1 जानेवारी 2024 पासून फायनान्स विश्वात होणार 5 मोठे बदल!

WhatsApp Group Join Now

New Year 2024 Financial Changes : नवीन वर्ष अगदी उंबरठ्यावर आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. पण या काळात वर्षाच्या पहिल्या दिवसा पासून फायनान्स च्या जगात काही मोठे बदल पाहायला मिळतील. हे बदल थेट आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करतील, आणि म्हणूनच त्यांच्या बद्दल माहिती असणे हे अनिवार्य आहे. चला तर मग जाणून घेऊया असा कोणता बदल आहे ज्या कडे आपण दुर्लक्ष करू नये.

Finance Changes From New Year 2024 | New Year 2024 Financial Changes

1. New UPI ID RuleNew Year 2024

आज पासून PhonePe, Gpay सारख्या पेमेंट Apps वर वर्षभराहून अधिक काळ बंद असलेले UPI IDs कायमचे बंद होणार आहेत. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) The National Payments Corporation of India (NPCI) 7 नोव्हेंबर 2023 च्या परिपत्रकात सर्व प्रमुख बँका आणि पेमेंट Apps ना 31 डिसेंबर 2023 पासून हा नवीन नियम लागू करण्यास सांगितले होते.

2. Bank Locker AgreementNew Year 2024

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India (RBI)) नव्या नियमांनुसार, जर तुम्ही तुमच्या बँकेत Locker ची सुविधा वापरत असाल तर तुम्हाला 31 डिसेंबर 2023 पूर्वी नवीन करार ावर स्वाक्षरी करावी लागेल. जर तुमच्या Locker चे भाडे भरले नाही तर तुम्हाला लॉकर वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

3. ITR Filing Deadline

जर तुम्ही टॅक्स भरला तर 2022 – 23 या वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 होती. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 234 एफ नुसार जर एखाद्या व्यक्तीने ITR भरण्यास उशीर केला तर त्याला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. पण ज्यांचे उत्पन्न पाच लाखरुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना एक हजार रुपये दंड आहे.

4. No paper-based KYC for SIM cards

1 जानेवारी 2024 पासून तुम्हाला नवीन सिम कार्ड घेण्यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही. दूरसंचार विभागाच्या अधिसूचने नुसार, कागदावर आधारित नो-योर कस्टमर (केवायसी) Department of Telecommunications (DoT) आता 1 जानेवारी 2024 पासून बंद होणार आहे.

5. Vehicle Price Increase

2024 मध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? वाहनांच्या किमती वाढणार असल्याने तयार राहा. मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ऑडी इंडिया सारख्या भारतातील बड्या वाहन उत्पादक कंपन्यांनी जानेवारी 2024 पासून वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

New Year 2024 Financial Changes

Change Notice/Schedule/New Rule
New UPI ID RulePhonePe, Gpay सारख्या पेमेंट Apps वरील तुमचे UPI IDs वर्षभरा पेक्षा जास्त काळ बंद असतील तर ते कायमचे बंद होतील.
Bank Locker Agreementजर तुम्ही बँकेत लॉकर वापरत असाल तर तुम्हाला 31 डिसेंबर 2023 पूर्वी नवीन करारवर स्वाक्षरी करावी लागेल. Locker चे भाडे न भरल्यास ते वापरता येणार नाही.
ITR Filing Deadlineकरदात्यासाठी 2022-23 साठी आयकर टैक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 होती. उशीरा टैक्स रिटर्न भरल्यास ₹5,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे, तर ज्यांचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना ₹1,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
No paper-based KYC for SIM cards1 जानेवारी 2024 पासून नवीन सिमकार्ड साठी पेपर वर आधारित Know Your Customer (KYC) केले जाणार नाही.
Vehicle Price Increaseमारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ऑडी इंडियाने जाहीर केल्याप्रमाणे जानेवारी २०२४ पासून वाहनांच्या किमती वाढणार आहेत.
New Year 2024 Financial Changes

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा :

Leave a Comment

WhatsApp Group Join Now